फूड लायसन्स चे महत्व

आजकाल ओळखपत्र आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक बनले आहे. कोणत्याही खासगी, व्यावसायिक आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी आपल्याला ओळखपत्राची आवश्यकता भासते. प्रत्येकाच्या जवळ आधारकार्ड, पॅनकार्ड, आणि मतदान कार्ड असतेच. तर उद्योग व्यवसाय करताना शॉप ऍक्ट लायसन्स आणि FSSAI (फूड लायसन्स) हि लागते. तर आपण आज याच फूड लायसन्स बद्दल बोलणार आहोत.

जर तुम्ही व्यवसाय करीत असाल, तर तुमच्याकडे हे दोन्ही लायसन्स असणे आवश्यक आहे. तरीही, अनेकांना फूड लायसन्स म्हणजे काय हे माहित नसते. आमच्या या  ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला FSSAI फूड लायसन्स बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.

फूड लायसन्स म्हणजे काय?

FSSAI म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण. या संस्थेचे मुख्य काम अन्न सुरक्षा आणि मानके निर्धारित करणे आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारी ही स्वायत्त संस्था आहे.

भारतात २००६ च्या अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांतर्गत FSSAI स्थापन करण्यात आले आहे. अन्नाशी संबंधित कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी FSSAI परवाना किंवा नोंदणी करणे अनिवार्य आहे. या व्यवसायात एक चौदा अंकी नोंदणी/परवाना क्रमांक पॅकिंगवर छापने किंवा व्यवसायाच्या ठिकाणी दर्शविणे आवश्यक आहे.

कोणासाठी फूड लायसन्स गरजेचे आहे?

FSSAI परवाना हा डेअरी युनिट्स, तेल प्रक्रिया युनिट्स, कत्तलखाना, मांस प्रक्रिया, री-पॅकर्स, रिलेबलर्स आणि प्रत्येक मॅन्युफॅक्चर किंवा अन्न प्रक्रिया युनिट्ससाठी आवश्यक आहे.

 याशिवाय, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, वितरक, पुरवठादार, ढाबा, खानावळ, क्लब/कँटीन, अन्न कॅटरिंग, हॉटेल्स, रेस्टोरंट्स, दूध वाहतूक, मार्केटर, फेरीवाले, निर्यातकार, आयातकार, ई-कॉमर्स/ऑनलाइन फूड डिलिव्हरी, फास्ट फूड, चायनीज सेंटर यांसारख्या व्यवसायांसाठी देखील हे परवाना गरजेचे आहे. अन्नाशी संबंधित व्यवसाय करणार्‍यांनी FSSAI परवाना आपल्या दुकानात लावणे अनिवार्य आहे.

FSSAI परवान्याचे फायदे

1. अन्न व्यवसायात कायदेशीर लाभ मिळतात.

2. ग्राहक जागरूकता निर्माण होते.

3. FSSAI लोगो वापरल्याने ग्राहकांमध्ये विश्वास वाढतो.

4. अन्न सुरक्षा सुविधा मिळतात.

5. संशोधन आणि विकास क्षेत्रात सुरक्षितता राखण्यासाठी FSSAI परवाना आवश्यक आहे.

6. FSSAI परवाना असल्यास व्यवसायात विस्तार करता येतो आणि मोठ्या संधींचा लाभ घेता येतो.

FSSAI परवान्याचे प्रकार

FSSAI स्टेट लायसन्स आणि FSSAI सेंट्रल लायसन्स.

FSSAI स्टेट लायसन्स:

1. वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा जास्त किंवा २० कोटींपर्यंत असलेल्या व्यवसायांसाठी अनिवार्य.

2. उत्पादन युनिटची दैनिक क्षमता दोन टन किंवा दुग्धव्यवसाय युनिट दैनिक ५० हजार लिटरपर्यंत असल्यास आवश्यक.

3. ३ स्टार हॉटेल्स, री-पॅकर्स, रिलेबलिंग युनिट्स, क्लब उपहारगृहे आणि सर्व कॅटरिंग व्यवसायांसाठी उलाढाल कितीही असली तरी अर्ज आवश्यक.

FSSAI सेंट्रल लायसन्स:

1. वार्षिक उलाढाल २० कोटींपेक्षा जास्त असलेल्या व्यवसायांसाठी अनिवार्य.

2. निर्यातकार, आयातकार आणि ई-कॉमर्स व्यावसायिकांसाठी आवश्यक.

FSSAI परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, पत्याचा पुरावा, विजेचे बिल किंवा भाड्याचा करार आवश्यक आहे. FSSAI परवान्याची वैधता १ ते ५ वर्षे असू शकते, त्यानंतर नूतनीकरण आवश्यक आहे.

स्टेट लायसन्ससाठी:

* आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, पत्याचा पुरावा, विजेचे बिल किंवा भाड्याचा करार आवश्यक.

सेंट्रल लायसन्ससाठी:

* आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, पत्याचा पुरावा, विजेचे बिल किंवा भाड्याचा करार, पाणी तपासणी अहवाल (हॉटेल आणि मॅन्युफॅक्चरसाठी), अन्न वर्ग यादी, उपकरणे यादी, युनिटचा फोटो, ब्ल्यू प्रिंट आणि अन्य कागदपत्रे व्यवसायानुसार आवश्यक.

Similar Posts